ताज्या घडामोडी

दत्तसेवा सहकारी पतपेढीचे कार्य कौतुकास्पद आहे: सर्जेराव पाटील

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
दत्तसेवा सहकारी पतपेढी व दत्तसेवा परिवाराचे सामाजिक कार्य समाजासाठी कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांनी केले.ते तुरुकवाडी ता शाहूवाडी येथे
दत्तसेवा सहकारी पतसंस्था मुंबई व दत्तसेवा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तुरुकवाडी येथे बांधण्यात आलेल्या स्मशानभुमीच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.यावेळी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज, डॉ.एस.एन पाटील पतसंस्थेचे संस्थापक डॉ.एस.एन.पाटील, पंचायत समिती सदस्य अमर खोत, दत्तसेवा परिवाराचे संस्थापक आनंदराव माईंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, दत्तसेवा सहकारी पतसंस्था नेहमी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबवित असते. तुरुकवाडी येथे पावसाळ्यात येणारी अडचण लक्षात घेऊन दत्तसेवा पतसंस्था व दत्तसेवा परिवाराने स्मशानभुमी उभारली आहे. हि गावांसाठी कौतुकास्पद बाब आहे.या कार्यक्रमास सरपंच गणपती कांबळे, उपसरपंच के.वाय.पाटील,आर.एस.पाटील,ग्रामविकास अधिकारी बी.ए.पाटील, ॲड सतिश माईंगडे, डॉ. बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, पांडूरंग पाटील, पतपेढीचे मुख्य व्यवस्थापक हरी पाटील, वसुली अधिकारी नंदकुमार पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील,प्रमोद पाटील, गणेश पाटील, दीप्तीताई माईंगडे आदींसह दत्तसेवा परिवाराचे सदस्य , तुरुकवाडी येथिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्मशानभुमीचे उद्घाटन करताना सर्जेराव पाटील, डॉ.एस.एन.पाटील, आनंदराव माईंगडे, पुरुषोत्तम महाराज व अण्य (छाया प्रतापराव शिंदे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!