ताज्या घडामोडी

कामगार कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून आपले काम व कर्तव्य पार पाडावीत-जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख

Spread the love

कामगार कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून आपले कामे व कर्तव्य पार पाडावीत व स्वताच्या व संस्थेच्या हिताच्या दृष्टीने कार्यतत्परपणे काम करावे असे मत दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख यांनी व्यक्त केले .

ते महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . आण्णासाहेब डांगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि . , इस्लामपूरच्या कार्यस्थळांवर दिनांक ४ मार्च ते ११ मार्च या दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य सप्ताहात मनोगत व्यक्त करताना बोलत होते . यावेळी बोलताना जनरल मॅनेजर श्री . विनोद देशमुख पुढे म्हणाले कि सर्वांनी कामकाजातील सुरक्षितते बरोबरच स्वताचे आरोग्य , कुंटुंबाची सुरक्षितता व परिसर स्वच्छता राखणे आवश्यक आहे . रोगराई वाढणार नाही या दृष्टीने सतत जागृत राहणे गरजेचे आहे .

राष्ट्रीय औद्योगीक सुरक्षिततेची शपथ शेफ्टी ऑफीसर रियाज कादरी यांनी सर्व कामगारांना दिली . यावेळी प्रोडक्षण मॅनेजर श्री . सुर्यकांत देसाई , श्रीहरी कुंभार यांनी आपली मनोगते व्यक्त केली . यावेळी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र लोंढे , फायनान्स मॅनेजर श्री . राजेंद्र मिरजे , लेबर ऑफीसर श्री . अदित्य यादव , मेंन्टनस मॅनेजर जावेद पठाण , इंजिनिअरिंग मॅनेजर श्री . सातलिंग मेत्री , कॉप्युटर इंजिनिअर श्री . एच . आर . पाटील , श्री . अमोल देशपांडे , उमेश गावडे , जयवंत सुर्यवंशी , श्री . दादासाहेब पाटील , आनंदराव मिठारी यांच्या सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

स्वागत व प्रास्ताविक श्री. बजरंग कदम यांनी केले . आभार श्री . अशोकराव बडदे यांनी मानले . कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत जाधव , विजय कवठेकर , अभिजीत बारपटे , विजय पाटील , भिमराव कांबळे , सचिन सोळवंडे , जगदीश कुशिरे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!