ताज्या घडामोडी

खैर प्रजातीचे वनोपजाने भरलेली महिंद्रा पिकअप सापळा रचून शिताफीने सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून गाडी जप्त

Spread the love

जळगाव प्रतिनिधी फिरोज तडवी पश्चिम नाशिक वन प्रकल्प विभागांतर्गत पेठ कार्यक्षेत्रात दि 03/03/2022 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने श्री. पी. आर. जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी झरी व श्री ए. आर. अजेस्त्र वनपरिक्षेत्र अधिकारी आंबा, श्री. एस. एच. भारोटे वनपाल, श्री. एच. बी. राऊत वनपाल, श्री. सी. जे. चौरे वनपाल, श्री. पी. पी. तायडे वनपाल, श्री. बी. पी. तायडे वनपाल तसेच एस. के. बोरसे, एम. जी. वाघ, आर. ए. गवळी, एम. व्ही. विसपुते वनरक्षक हेमंत भोये वाहन चालक हेमराज गवळी पोलिस कॉन्स्टेबल व फिरते पथक यांच्या एकत्रित वनसंरक्षण गस्ती दरम्यान पेठ तालुक्यातील आंबास गावानजीक MH 11 T 5369 वाहन ने खैर प्रजातीचे वनोपजाने भरलेली महिंद्रा पिकअप सापळा रचून शिताफीने सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून गाडी जप्त करून वनउपज ताब्यात घेतला. सदर वाहनात खैर प्रजातीचे 15 नग 1.477 घ.मी. अंदाजे रुपये 1लक्ष किमतीचा वनउपज व वाहनाची किंमत रु. 3.5 लक्ष अशी एकूण 4.5 लक्ष रू. किमतीचा ऐवज जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली.
सदर कार्यवाही श्री. पी. टी. मोराणकर प्रादेशिक व्यवस्थापक सो. नाशिक., सौ. टी. एल. ठाकूर विभागीय व्यवस्थापक नाशिक तसेच श्री. डी. पी. परदेशी सहाय्यक व्यवस्थापक पेठ घटक 1 यांचे मार्गदर्शनाखाली उपरोक्त कार्यवाही करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!