ताज्या घडामोडी

8 मार्च जागतिक महिलादिनी कामेरीत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

सावित्री महिला मंडळाचा उपक्रम

इस्लामपूर  दि 5  (वार्ताहर )

कामेरी ता वाळवा   स्व. भीमराव पाटील (आण्णा) यांच्या पुण्यतिथी  व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा व  मनोरंजन कार्यक्रमाचे सावित्री महिला मंडळाच्या वतीने आयोजन केले आहे. अशी माहिती संस्थापक सचिव सौ.छाया अनिल पाटील यांनी दिली
यावेळी सोमवार 7 मार्च ला सकाळी १० ते ११
यावेळत पाककला स्पर्धा घेण्यात येणार  आहेत. महिलांनी गहू व डाळीचे या पैकी कोणताही एक पदार्थ बनवायचा आहे. यातील विजेत्या महिलांना  प्रथम क्र.  5 लिटर प्रेस्टीज कुकर व्दितीय क्र. – बजाज इस्त्री व  तृतीय क्र. डिनर सेट तर उत्तेजनार्थ हॅण्ड पर्स  बक्षीस देण्यात येणार आहे .तर ७ मार्च रोजी  सकाळी ११ ते १२.३० रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रांगोळी साठी लागणारे साहित्य आपआपले आणणेचे आहे  महिला सबलीकरण व  संस्कार भारती या विषयांवर रांगोळी काढावयाची आहे.
प्रथम क्र. – हातातील घडचाळ (फास्टट्रक) व्दितीय क्र. – बजाज इसी तृतीय क्र. डिनर सेट उत्तेजनार्थ हॅण्ड पर्स उत्तेजनार्थ हॅण्ड पर्स अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.मंगळवार ८ मार्च रोजी जगात भारी नऊवारी (रॅम्प वॉक स्पर्धा)  सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे
यातील विजेत्यां मुली च्या साठी प्रथम क्र. चांदीचे निरंजनव्दितीय क्र.- खण साडी,तृतीय क्र. ऑक्साईड ज्वेलरीमहिलाना प्रथम. चांदीचा छल्ला,व्दितीय क्र  ड्रेस मटेरियल ,तृतीय क्र. बजाज इस्त्री व उत्तेजनार्थ हॅण्ड पर्स उत्तेजनार्थ हॅण्ड पर्स उत्तेजनार्थ हॅण्ड पर्स उत्तेजनार्थ हॅण्ड पर्स बक्षीस देण्यात येणार आहे.  दु. १. वा.सखी महिला ग्रुप कराड यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे . तर मंगळवार दि. ८ मार्च रोजी दु. ३. वाजता बक्षिस समारंभ होणार आहे .सायं. ७.३० वा.खास महिलांच्या आग्रहास्तव ” झिम्मा” मराठी चित्रपट भैरवनाथ मंदीर कामेरी येथे दाखविण्यात येणार आहे  तर सर्व स्पर्धा भीमराव पाटील (आण्णा) सोसा. हॉल, कामेरी. येथे होणार आहेत .या कार्यक्रमादरम्यात ५ लकी ड्रॉ असणार लकी ड्रॉ व हळदी कुंकू समारंभ प्रथम येणाऱ्या ३०० महिलांना लकी ड्रॉ साठी कुपन मिळेल. स्पर्धे बाबत अधिक माहितीसाठी संपर्क- सौ. वर्षा चौगुले मो.नं. ९१७५१४५४०० स्पर्धेचे आयोजन सौ.स्मिता साकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री महिला मंडळाच्या वतीने केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!