ताज्या घडामोडी

शिराळा सखी मंच वतीने महिला सदस्यांसाठी ‘जल्लोष २०२२’ चे आयोजन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

येत्या रविवारी (ता. १३) शिराळा सखी मंच मार्फत मंचच्या महिला सदस्यासाठी “जल्लोष २०२२” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती मंचच्या व शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष साधनाताई पाटील यांनी दिली.

त्या म्हणाल्या, शिराळा तालुक्‍यातील महिलांना व्यक्त होण्यासाठी व कलागुणांना वाव देणार हक्काचे व्यासपीठ मिळावे, या दृष्टिकोनातून आपला बझार उद्योग समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक यांनी शिराळा सखी मंचची स्थापना २०१९ मध्ये केली. त्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

२०१९-२० वर्षात खास महिलांकरिता लावणी सोहळा, स्वसंरक्षण प्रशिक्षण, हळदीकुंकू, विविध गुणदर्शन स्पर्धा, नवदुर्गा सन्मान सोहळा अशा वैविध्याने नटलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या काळात कार्यक्रम थांबवण्यात आले होते. आता मंचच्या सदस्यत्वासाठी जानेवारी २०२२ पासून नवीन नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यास संपूर्ण तालुक्यातून महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने “जल्लोष २०२२” हा कार्यक्रम “रसिका मल्टीपर्पज हॉल” शिराळा येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

सौ. पाटील म्हणाल्या, “जल्लोष २०२२” सुमित डान्स अकॅडमी सांगली तर्फे सादर होणाऱ्या कार्यक्रमात ४० कलाकारांचा समावेश असून गाणी, विनोद, धमाकेदार नृत्याचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित सभासदांपैकी तीन भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ दिली जाणार आहे. शिराळा सखी मंचच्या नाव नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल महिला प्रतिनिधींचा सत्कारही केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सभासद व इतरही महिलांना निमंत्रित करण्यात आले आहे. या महिलांनी महिलांसाठी राबवलेल्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता शिराळा तालुक्यातील महिलांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सुद्धा नाव नोंदणी सुरू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!