ताज्या घडामोडी

प्रथम फौन्डेशन अंतर्गत चेंबूर पेस प्रशिक्षण केंद्रातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात

Spread the love

मुंबई – भारतातील १५ राज्यांमध्ये रोजगार आणि उद्योजगता संधीसाठी बेरोजगार तरुण- तरुणींना प्रशिक्षित व रोजगाराचे कौशल्य देण्याचे काम करत असलेलल्या प्रथम एज्युकेशन फौंडेशन संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या चेंबूर प्रशिक्षण केंद्राच्यावतीने जागतिक महिला दिन नुकताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास चेंबूर पोलीस ठाण्यातील कर्तबगार महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल कदम, अथर्व हॉस्पिटलच्या डॉ.शुभदा सकपाळ,कौटुंबिक न्यायालयाच्या वकील रिंकू पांड्या,टाटा मोटर्स प्रकल्पाच्या अंजली निकम ,सामाजिक कार्यकर्त्या कुसुम झेंडे,नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव,पत्रकार संतोष भालेराव तसेच पेस प्रशिक्षण केंद्र चेंबुरचे केंद्र प्रमुख अनिल शिशुपाल आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पेस प्रशिक्षण केद्रातील अजित बनसोडे ,अरुण नरवडे, अपूर्वा कदम ,प्रियांका सावंत,पूजा कांबळे,दिव्यांका सावंत, मीनल खरपे आणि सर्व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी महिला सक्षमीकरणासाठी आपपल्या क्षेत्रातील उदाहरणे देऊन महिला विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!