ताज्या घडामोडी

कांदिवली पश्चिम येथे भाजपा महिला मोर्चा विधानसभा विभागातील महिलांसाठी महिला दिना निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई
कांदिवली पश्चिम एकता नगर,अभ्यासिका या ठिकाणीं भाजपा महिला मोर्चा विधानसभा व सिध्दाई महिला औद्योगीक उत्पादन सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १२मार्च २०२२रोजी सकाळी १० ते दुपारी २वाजेपर्यत ८मार्च महिला दिना निमित्त महिला साठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात महिलांसाठी ई.सी.जी.,रक्तदाब,नाडी तपासणी,रक्तामधील आक्सीजन चे प्रमाण,स्त्री रोग तपासणी,अस्थिव्यंग,हाडातील कमजोरी,सांधेदुखी,सूज,यावर विशेष डाक्टर व अपेक्स रुग्णालय बोरीवली यांनी महिला वर्गाची तपासणी करून योग्य निदान व उपचारा बाबत सल्ला दिला,डा.राकेश दुबे,डा.निलू जैन डा.राहुल सिंह, डा.सपना शाह,आदि डाक्टरांचे या आरोग्य शिबीरास उत्तम सहकार्य लाभले,महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा रेश्मा टक्के यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, नगरसेवक कमलेश यादव, नगरसेवक बाळा तावडे, नगरसेविका लिना दहेरकर,नगरसेविका प्रियंका मोरे, प्रणाली बोंबले,व्योमा भट,रुपाली चाळके,बबली शर्मा,उर्मिला कावले,पारूल त्यागी,सुनंदा सावंत,प्रीती थोरात,हिना टेलर,शालीनी मोरे,योगेश पडवळ,संजय सिंह, मुकेश चौधरी, साहित्यिक पत्रकार भारत कवितके, विजय पाल,प्रविण पाल, आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!