ताज्या घडामोडी

समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ४ (प्रतिनिधी)

येथील संभाजीराजे सार्वजनिक वाचनालय व आईश्री विनंता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, यशवंत नगर यांच्या संयुक्त विद्यमाने समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ मंगळवारी (ता.३) रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस धम्मचारी धम्मभुषण यांच्या हस्ते पुष्प पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार यावर्षी माजी सहायक पोलिस उपनिरीक्षक राम कांबळे (धम्मचारी धम्मभूषण) व धम्ममित्र सुनीता राम कांबळे यांना देण्यात आला. धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासारशिरशीच्या प्राचार्या सविता मुरुमकर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. तसेच प्रा. डॉ. नरसिंग कदम यांची प्रोफेसरपदी पदोन्नती झाल्याबद्दल सपत्नीक तसेच डॉ. मनीषा जनार्धन नागीले-कांबळे यांनी हिंदी विषयामध्ये विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त केल्याबद्दल सपत्नीक, जिल्हा परिषद स्पेशल शाळा, मुरुम येथून सेवानिवृत्त झाल्याबद्दल श्रीमती साबेरा मुल्ला, पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पत्रकार अजिंक्य राम कांबळे व न्यूज एक्सप्रेस, पुणे येथे कार्यरत पत्रकार राजेश मुरुमकर आदीं मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व सत्कारमूर्ती यांनी आपल्या मनोगतातून महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती मनीषा माने, कुस्तीगीर अनिल बिराजदार, माजी उपमुख्याध्यापक सतीश सावंत, माजी नगरसेविका संध्या सावंत, बेबी कांबळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सावंत तर आभार सविता मुरुमकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!