आरोग्य व शिक्षण

टीडीएफ कडून मोफत अल्पोपहार

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई :- मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच टीडीएफ या शिक्षक संघटनेकडून नुकतेच शिक्षकांसाठी उन्हाळी सुट्टीत सोडण्यात आलेल्या वाराणसी रेल्वे गाडीतील शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांसाठी लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी यांचे सहकार्याने व शिक्षक नेते टीडीएफ अध्यक्ष जनार्दन जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत अल्पोपहार वाटण्यात आला.ही विशेष ट्रेन शिक्षकांसाठी सोडण्यात यावी म्हणून नुकतेच टीडीएफ चे पदाधिकारी बाबूभाई यांच्या उपस्थितीत रेल्वे च्या पदाधिकऱ्यांना भेटले होते. तसेच त्यांच्या निवेदनाचा मागणीचा विचार करीत दि. 2 मे रोजी ही विशेष ट्रेन सोडण्यात आली.तसेच शिक्षक हा समाजाचा महत्वाचा दुवा व भक्कम पाया असून त्यांच्या सुख सुविधांसाठी शासनाने नेहमीच प्रयत्नशील रहायला पाहिजे,असे मत बाबूभाई भवानजी यांनी मांडले. तसेच अन्यायग्रस्त शिक्षकांना टीडीएफ संघटना न्याय मिळवून देण्यात, शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते,असे जंगले सरांनी संगितले.अल्पोपहार वाटप करण्यासाठी प्रवक्ते सुरेंद्र मिश्रा,उपाध्यक्ष लालजी कोरी, सुनील वडतकर, अजय यादव, एम डी पाटील, सेठी सर , मसुरकर सर व अनेक कार्यकर्ते वेळातवेळ काढून लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला येथे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!