ताज्या घडामोडी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळ,व कु.संगिता चेंदवणकर, गिरीश राणे आयोजित आंबा-काजु मालवणी महोत्सवास जोशात सुरुवात

Spread the love

बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटमय काळानंतर लाॅकडाऊन उठवल्यामुळे शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत,त्याच अनुषंगाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळ,व आयोजक गिरीश राणे कु.संगिता चेंदवणकर यांच्या पुढाकाराने १०एप्रिल ते १७एप्रिल२०२२पर्यंत आपटे मैदान,सागर डेअरीच्या बाजुला,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बदलापुर(पुर्व)येथे आंबा-काजु,मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या मालवणी महोत्सवाचे उदघाटन प्रकाशजी मर्गज यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सचिव मंगेश कदम,उपाध्यक्ष आबा बांदेकर,कार्याध्यक्ष महेश सावंत,सहखजिनदार एकनाथ संभाजी राणे,माजी अध्यक्ष अरविंद सावंत,दिपक वायंगणकर,सुनिल दळवी,जादुगर अभिजीत,मंगेश सावंत,आयोजक गिरीश राणे,कु.संगिता चेंदवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.मालवणी महोत्सवात आंबा-काजु व विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल लावण्यात आलेले आहेत.तसेच मालवणी मच्छी कडी,मटन,चिकन,कोंबडी वडे अशा प्रकारच्या मालवणी चवीच्या हाॅटेलही थाटण्यात आलेली आहेत.या महोत्सवात विविध कार्यक्रम,होम मिनिष्टर पैठणी,भजन,दशावतारी नाटक असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.या मालवणी महोत्सवास समस्त बदलापुरकर वासियांनी भेट द्यावी,व मालवणी संस्कृती,मालवणी पदार्थ व विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळ तसेच आयोजक गिरीश राणे व कु.संगिता चेंदवणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!