ताज्या घडामोडी

नाट्य व कथा लेखिका प्रा.दीपाली सोसे ‘मातृशक्ती पुरस्कार-२०२२’ने सन्मानित

Spread the love

अकोला(दि.१४):जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने संघर्षमय वाटचालीतून यशस्वी झालेल्या व विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व महिला काँग्रेस यांच्या वतीने आयोजित ‘विदर्भस्तरीय मातृशक्ती सन्मान सोहळ्या’मध्ये सुप्रसिध्द कथा व नाट्यलेखिका तथा आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र,अकोलाच्या संस्थापक प्रा.दीपाली आतिश सोसे यांचा प्रदेश महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन ‘मातृशक्ती पुरस्कार-२०२२’सन्मानपूर्वक बहाल करुन सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी व्यासपीठावर अविनाश देशमुख,अशोकराव अमानकर,,सागर कावरे,पुष्पाताई गुलवाडे,पूजाताई काळे,जया देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
दीपाली सोसे या नाट्य व कथालेखिका,कवयित्री,समुपदेशिका,गीतकार,संपादक,निवेदक आणि व्याख्यात्या म्हणून प्रसिध्द असून त्यांनी सहा विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी,सीईटी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून नववी मेरिट येऊन प्रथम श्रेणीचा मान सातत्याने मिळवला आहे.
आजवर त्यांची वेगवेगळ्या विषयांवरील सेहेचाळीस पुस्तके प्रकाशित असून वीसहून अधिक लघुपट, ध्वनिफित,चित्रफित प्रसिध्द झाल्या आहेत.सध्या त्या पीएच.डी.करीत असून सिताबाई कला महाविद्यालयामध्ये अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून त्या पदव्युत्तर विभागातही अध्यापन करीत आहेत.त्यांनी आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्राची स्थापना करुन अनेक विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करुन त्यांना मराठी,हिंदी,तमीळ,तेलुगु भाषेतील चित्रपटांसह मराठी मालिका व रंगभूमीच्या माध्यमातून संधी मिळवून दिल्या आहेत.
त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सन्मान म्हणून भारतातील अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले असून ‘मातृशक्ती पुरस्कार’ने आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन जो सन्मान दिलाय,हा प्रेरणादायी असल्याची भावना प्रा.दीपाली सोसे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!