आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

ऐसी कळवळ्याची जाती– करी लाभाविण प्रीती! किशोरभाऊंवर अत्यंतिक प्रेम करणारे आपण सर्व आप्तसकीय शोकाकुल मित्रांनो–

या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करणाऱ्या किशोर भाऊंच्या स्मृती जर पुसाणेकरांना खऱ्याअर्थाने जपायच्या असतील तर पुसाणेकरांनी भाऊंचा प्रेरणादायी पुतळा पुसाण्यात उभारावा.डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

Spread the love

ऐसी कळवळ्याची जाती– करी लाभाविण प्रीती! किशोरभाऊंवर अत्यंतिक प्रेम करणारे आपण सर्व आप्तसकीय शोकाकुल मित्रांनो–Such kind of compassion–a profitable love! All of us dearly bereaved friends who love teenage siblings dearly–

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ मे.

आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या दोन ओळी प्रकर्षाने आठवण्याचं कारण म्हणजे- किशोर भाऊंनी अचानक घेतलेला आपला निरोप! भाऊ अशा प्रवासाला निघून गेलेले आहेत की जिथे परतीचा रस्ताच नाही! आज भाऊंचं अस्तित्व संपलं असलं तरी आठवणी मात्र मनाच्या शिंपल्यात मोत्यासारख्या माझ्यासारख्या अनेकांनी जपून ठेवलेल्या आहेत.

मी खानदेशातून वैद्यकीय व्यवसायासाठी तळेगावला आलो, परंदवडी- बेबड ओहोळ पाचाणे- पुसाणे- दिवड ओहळे- कासरसई कुसगाव -आढले आणि चांदखेड अशा दहा गावात वैद्यकीय सेवेत रुजू झालो! त्यानिमित्ताने अनेक व्यक्तींशी माझा संपर्क आला! त्यांचा सहवास घडला, त्यापैकी वशिष्ठपूर्ण एक व्यक्तिमत्व- म्हणजे किशोरभाऊ! त्याला कारणही तसंच होतं– भाऊंच्या वागण्यात बोलण्यात स्वामीत्वापेक्षा समर्पणाची भावनांच- त्यांना भेटणाऱ्यां प्रत्येकाला जाणवायची. भाऊंना भेटणाऱ्या प्रत्येकाची भाऊ मनापासून विचारपूस करायचे! किंबहुना तो त्यांच्या स्वभावाचा स्थायीभावच होता! सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं होतं– उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन मी पाऊ! येणाऱ्या पाहुण्यांची सूचना देणाऱ्या कावळ्याचे पाय मी सोन्यानं मढवीन ही संस्कृती प्रत्यक्ष भाऊ जगत होते! पुसाणे या भाऊंच्या गावापासून– त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही शुद्धपेय जल योजना- लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सहकार्यातून सुरू केली! आणि ती इतरही गावांना उपलब्ध करून दिली.

कोविडच्या काळात भाऊंनी रोज किमान 400 ते 500 रुग्णांच्या नातेवाईकांना केवळ पाच रुपयात रुचकर भोजनाची योजना राबवली! कोविड रुग्णांची हॉस्पिटल बिल वाजवी स्वरूपात करून देणे! त्यांना हॉस्पिटल ऍडमिशन आणि औषधांसाठी आर्थिक मदत करणे. कराड- मिरज- सांगली या पूरग्रस्तांना सतत दोन वर्ष जीवनाशक वस्तूंचा पुरवठा करून भाऊंनी आपली निस्वार्थ सेवा रुजू केली! एमराल्ड रिसॉर्टच्या निर्मितीतून- कौटुंबिक संस्कृतिक सामाजिक समारंभास अतिशय अत्याधुनिक देखणं समारंभ स्थळ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलं.अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष- गो नि दा यांच्या नावाने स्टेशन विभागात अतिशय देखण्या उद्यानाची निर्मिती केली! तळेगाव जनरल हॉस्पिटलला प्रसूत होणाऱ्या माता भगिनींच् बिल भरण्याची व्यवस्था- भाऊंनी स्वतः घोषित केली नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतही आणली.

टोलमुक्त मावळासाठी सातत्याने मोर्चे- उपोषण करून शासनाच लक्ष वेधून घेतलं! भाऊंनी या जगाचा निरोप घेताना सौर ऊर्जेच्या माध्यमातून पुसाणे या आपल्या जन्मस्थळाला स्वयंप्रकाशित केलं! या जगण्यावर-या जन्मावर शतदा प्रेम करणाऱ्या किशोर भाऊंच्या स्मृती जर पुसाणेकरांना खऱ्याअर्थाने जपायच्या असतील तर पुसाणेकरांनी भाऊंचा प्रेरणादायी पुतळा पुसाण्यात उभारावा की- जेणेकरून ते येणाऱ्या पिढीला एक प्रेरणास्थान ठरेल! ही समस्त ग्रामस्थांना एक नम्र सूचना आहे! लायन्सक्लब तळेगाव- मावळ डॉक्टर असोसिएशन- इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जेष्ठ नागरिक मित्र मंडळ या सर्वांच्या वतीने किशोरभाऊंना श्रद्धांजली वाहतो.

भाऊंच्या स्वर्गस्थ आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आखताना – नियतीने अल्पायुषी ठरवलेल्या निष्काम कर्मयोगी भाऊंसाठी अंतकरणात उमटलेले शेवटचे शब्द– दिव्यत्वाची जेथे प्रचिती- तेथे कर माझे जुळती! तेथे कर माझे जुळती! शोकाकुल- लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!