ताज्या घडामोडी

सांगली शहरांमध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी..

Spread the love

आज सांगली शहरांमध्ये थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिदास लेंगरे व अहिल्यादेवी समाज प्रधान मंच महाराष्ट्र राज्य मुंबई सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पार पडले.छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूरे राहीलेले स्वप्न साकार करणारे व संपूर्ण भारतातच नव्हे तर अफगाणिस्तानच्या “अटके” वर मराठ्यांचा “भगवा ध्वज” फडकवणारे
महान योध्दे,होळकरशाहीचे जनक, वीरश्रेष्ठ, रनझुंजार, मालवाधिपती, इंदोर नरेश, श्रीमंत सुभेदा “सुभेदार मल्हाररावजी होळकर” यांचा जन्म १६ मार्च १६९३ साली पुणे जिल्हयातील जेजूरी जवळ “होळ” या गावी झाला.अशा या महान योद्ध्यांच्या
३२९ व्या जयंती निमित्ताने मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक मधुकर हाके ,नेताजी चव्हाण, आर्टिस्ट पवन चव्हाण, ठोंबरे, राहुल दुधाळ यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!