ताज्या घडामोडी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे कदम निश्चित

Spread the love

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या राज्य नेत्यांनी सत्यजित कदम यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यांचे नाव दिलेल्या पाठवले आहे. दिल्ली येथे होणाऱ्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत आज सायंकाळी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजपातर्फे महेश जाधव व सत्यजित कदम यांची नावे चर्चेत होती. यापैकी पहिल्या पसंतीचे मत कदम यांच्या नावाने देण्यात आले आहे. याबाबत ईगल न्यूजने दोन दिवसापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. काही नेते म्हणत होते की कोल्हापूर उत्तर मतदार संघाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. पण भाजपाने पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. जयश्री चव्हाण यांनी भाजपातर्फे निवडणूक लढवावी आणि त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजप लोकशाही मार्गाने विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला महत्त्वाचे स्थान आहे. राज्यात आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील,विज प्रश्न असतील, एसटी महामंडळाचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, व्यावसायिकांचे प्रश्न असतील अशा विविध टप्प्यावर अपयश आले आहे. हे महाविकास आघाडीला आलेले अपयश भाजपच्या पथ्यावर पडेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले त्यामुळे भाजपाचे मनोबल वाढले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार चांगले काम करत असून याचा फायदा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!