ताज्या घडामोडी

होळी लहान पोळी दान’ शिराळा तालुका पत्रकार संघ व कोटेश्वर महिला मंडळाचा उपक्रम

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कालानुरूप सण साजरा करताना होळी लहान असावी तसेच पुरणाची पोळी देखील भुकेल्याच्या मुखात जावी यासाठी ती दान करावी हा उद्देश ठेवून होळी लहान पोळी दान हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न शिराळा तालुका पत्रकार संघ,व कोटेश्वर महिला मंडळाने शिराळा शहरात उपक्रम राबविला .
या वेळी मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार सुमंत महाजन,रविंद्र कदम,मंडळाच्या कार्याध्यक्षा प्राचार्या डॉ. सौ.उज्वला पाटील,कोषाध्यक्षा सौ.सुचेता हसबनिस,संचालिका सौ. नंदिनी काटकर सौ.स्मिता कदम,सौ.दिपाली निकम,सौ.सीमा डांगे,सौ.वंदना जाधव, सौ.जिज्ञा गायकवाड सौ.डांगे, आदी प्रमुख उपस्थितीत होत्या.
आपल्याकडे होळी दिवशी पुरणाच्या पोळ्या करण्याची परंपरा आहे. घरात गोड धोड केलं जातं ,होळीत दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा .याच भावनेने होळीत पुरण पोळी अर्पण केली जाते. सर्वसाधारण एका सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या होळीत अंदाजे 5 ते 10 पोळ्या तसेच घरगुती केलेल्या होळीत ही नैवद्य म्हणून भक्ती भावाने अर्पण केल्या जातात.संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर अक्षरशः लाखो पुरण पोळ्या अग्नीच्या अधीन होतात.आजही 20% महाराष्ट्र अर्धपोटी झोपतो.किमान जळून
जाणारी पोळी आपल्या गरजू बांधवांना दिली तर त्याच्या पोटात पेटलेली भुकेची होळी शांत होईल व त्याचे खरे समाधान होईल.
हे ओळखून महिला मंडळाच्या सदस्यांनी हा उपक्रम राबवित स्वतःहून होळीत पोळी न टाकता एक घास आनंदाचा मानून सद्स्यांनी स्वतः व अन्यजनांनी महिला मंडळापर्यंत पोहोचवलेल्या पुरण पोळ्या, गुळवणी,कटाची आमटी,भाजी,तळण आदी सह शिराळा येथील डांगे वस्ती नजीक मोल मजुरी करून झोपडीत राहणाऱ्या गरजूंपर्यंत पोहचवल्या.या गरजू कुटुंबियांना व लहानग्यांना होळी निमित्ताने गोड धोड खायला मिळाले याचा आनंद यावेळी दिसला.
होळी लहान पोळी दान या उपक्रमामागे राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे व पर्यावरणाचे प्रदूषण थांबविणे हा उद्देश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!