ताज्या घडामोडी

चेंबूरमधील शिव कट्टा संघटनेची यंदाची शिवजयंती दणक्यात होणार

Spread the love

मुंबई – चेंबूरमधील घाटले गावदेवी मैदानाजवळ असलेल्या शिवकट्टा संघटनेचा यंदाचा शिव जयंती उत्सव सोमवार २१ मार्च रोजी दोन वर्षानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा केला जाणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवकट्टा संघटनेतर्फे उभारण्यात येणार्‍या देखाव्याला आणि शिवप्रतिमेच्या दर्शनासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी उसळत असते. या परिसरातील इतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांच्या शिवजयंती मिरवणुकांची सुरुवात याच मंडळाला भेट देऊन होत असते. तसेच तसेच छत्रपती शिवाजी सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नगराळे यांचे कार्यकर्ते दरवर्षी रायगडावरून शिवज्योत आणतात त्याचे भव्य स्वागत याच ठिकाणी केले जाते. या संघटनेचे आधारस्तंभ भूषण पाटील तर संस्थापक शरद भोसले हे आहेत.तसेच संघटनेचे अशोक अनुसे, विजय भोसले, किशोर गावडे, तुषार चव्हाण,विवेक सप्रे आणि परशुराम मटकर आदी पदाधिकारी आणि सदस्य उत्सवाचे आयोजन उत्कृष्टरित्या करत असतात. सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!