ताज्या घडामोडी

तिथीनुसार वाटद मध्यवर्ती शाखेत शिवजयंती अत्यंत उत्साहात साजरी

Spread the love

शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे आज तिथीनुसार वाटद मध्यवर्ती शाखेत शिवजयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली, प्रथम जयगडच्या किल्ल्यावरून शिवज्योत ज्येष्ठ शिवसैनिक अन्नूदादा साळवी यांच्या शुभहस्ते प्रज्वलीत करून, किल्ल्यात असलेल्या श्रीगणेशाचे दर्शन, श्री किल्लेकरांचे आशीर्वाद घेतले, शिवरायांचा जयघोष करत शिवज्योत शिवसेनेच्या शाखेत आली, शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची मनोभावे पूजा करून आरती करण्यात आली, यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते, शिवजयंती साजरी करण्यासाठी उपविभागप्रमुख नामदेव चौगुले यांनी फार मेहनत घेतली, कळझोन्डी आणि गडनारळ च्या कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केलं, नामदेव चौगुले यांच्या वडिलांच्या डोक्याला काल मार लागला आणि वाटद प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर डॉ कदम मॅडम यांनी उपचार केले. अशाही परिस्थितीमध्ये नामदेव चौगुले यांनी घेतलेली जबाबदारी पार पाडली आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय, म्हणून नामदेव चौगुले यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असे शिवसेना वाटद विभागाचे संघटक श्री .उदयजी माने म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!