ताज्या घडामोडी

ना.जयंतराव पाटील यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत कोल्हापूरला विमानाने येऊन कोरेगाव येथील जखमी रुग्णांची वेग-वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतलीभेट

Spread the love

इस्लामपूर दि.२१ प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत कोल्हापूरला विमानाने येऊन कोरेगाव येथील जखमी रुग्णांची वेग-वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. ‘घार फिरे आकाशी,मात्र तिचे लक्ष पिलापाशी ‘याचा अनुभव कोरेगाव (ता.वाळवा) येथील जखमी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. या घटनेची चर्चा कोरेगाव व परिसरात केली जात आहे.
कोरेगाव (ता.वाळवा) येथील काही ग्रामस्थ ट्रॅक्टरने जोतिबाला देव दर्शनास गेले होते. मात्र घरी परतत असताना कासारवाडी येथे त्यांची ट्रॉली पलटी होऊन मोठा अपघात झाला होता. यामध्ये १ व्यक्ती मयत,तर २२ व्यक्ती जखमी झाल्या होत्या. या अपघाता तील सर्व जखमींना कोल्हापूर येथील वेग- वेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. काही दिवसापूर्वी युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी कोल्हापूरला विविध हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी रुग्णांना भेटून दिलासा दिला होता.
ना.पाटील हे मुंबईवरून विमानाने कोल्हापूरला आले. ते सीपीआर हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल,डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच सिध्दांत हॉस्पिटल येथील जखमी रुग्णांना भेटले. ‘काळजी करू नका. आपण लवकरच बरे व्हाल. आम्ही आपल्या सोबत आहोत’या शब्दात त्यांनी रुग्णांना धीर दिला. त्यांनी त्या-त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांशीही चर्चा केली. यावेळी ज्या काही अडचणी आहेत,त्या सोडविण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. या तीन-चार तासांच्या भेटीनंतर ते विमानाने मुंबईला रवाना झाले.
दरम्यान ना.पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बी.के.पाटील व कोरेगाव येथील कार्यकर्त्यांच्याकडून अपघात व जखमींच्याबद्दल माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत कोरेगावचे संग्राम पाटील, विक्रम पाटील,विजय पुदाले,राजेंद्र पाटील, स्वीय सहाय्यक मोहन चव्हाण,जयंत दारिद्र निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!