आरोग्य व शिक्षण

ई -पीक पहाणी अॅपच्या समस्या संपवा व पुर्वीची पीक नोंदणी प्रक्रीया  कायम ठेवा – दत्तात्रय फडतरे

मुख्यमंञ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी  

Spread the love

पुणे : राज्य शासनाच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पिकाच्या नोंदणीसाठी “माझी शेती, माझा सातबारा,मीच नोंदविणार माझा पीकपेरा” उपक्रमांतर्गत  स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशन निर्मिती केली आहे .१५ ऑगस्टला हे ऍप लाँच केले गेले आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद केल्यास उत्पादन, जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावुन त्याआधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन- तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

परंतू, दिड महिन्यांपासुन सर्व्हर हळू चालणे, नेटवर्क अचानक गायब होणे , आदिवासी , दुर्गम , डोंगराळ भागात नेटवर्कची समस्या कायम आहे, अनेक शेतकर्यांकडे अॅन्डराॅंईट फोन नाहीत, अॅप इंस्टाॅल करुन मोबाईल इंटरनेट सुरु असला तरी देखील इंटरनेट बंद आहे असे दाखवणे , इंटरनेट फुल रेंज असुनही अॅप न चालणे, अॅप इंस्टाॅल न होणे,दर्जाहीन पीक पहाणी अॅपच्या कटकटी वाढल्याने तसेच ऍपद्वारे नोंदणी होत नसल्याने राज्यातील शेतकर्‍यासाठी ई -पीक पहाणी अॅपच्या समस्या संपवा व सर्व समस्याचे निवारण होईपर्यंत पुर्वीची पीक नोंदणी प्रक्रीया कायम ठेवण्याची मागणी पुणे येथील दत्ताञय फडतरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांकडे केली आहे.

अॅपमध्ये शेतकरी माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. रियल टाइम माहिती अॅप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. पारदर्शकता येवुन शेतकऱ्यांचा सहभागादवारे पीक विमा पीक पाहणी दवारे पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल, यामुळे पिकांचे अचूक क्षेत्र कळणार आहे. राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. ई-पीक नोंदणी प्रकल्प यापूर्वी प्रायोगिक तत्वावर राबवुन नंतर उपक्रम राज्यभर राबविण्याचा शासन आदेश जारी केला आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभागीय ,जिल्हा आणि तालुका स्तरिय समित्या गठित करण्यात आल्या असल्याचे शासनामार्फेत सांगण्यात आले आहे .परंतू , ई-पीक पहाणी ॲप ओपन होत नसल्याने तसेच असंख्य तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असून अॅप गटांगळ्या खात असल्याने बहुतांश शेतकरी वैतागून ऑनलाइन पिकाची नोंदणी करण्याचा नादच सोडून देण्याच्या तयारीत आहेत.

राज्यात किती शेतकरी आहेत, किती खातेदार आहेत, किती फोटो अपलोड या ऍपमध्ये होतील त्याप्रमाणे ऍपची क्षमता बनविणे, या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन निर्मिती करणे आवश्यक होते. मात्र महसूल विभागाने तसा विचार न केल्याने ई – पीक पाहणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून लक्षात येत आहे. अॅपद्वारे सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी आवश्यक आहे. शासनाने तलाठी यांना शेतकऱ्यांच्या अर्जानूसार पीक पेऱ्याची नोंद घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र काही आठवड्यांपासुन पीक पहाणी ॲप बद्दल तांञिक समस्या असल्याने अॅप सुरळीत चालत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. ई-पीक पहाणी अॅपवर नोंदणी नसल्यास पीक कर्ज, पंतप्रधान पीक विमा योजना,जंगली जनावरांनी पिकांचे नुकसान केल्यास मदत, शासनाने जाहीर केलेल्या पिकाची पीक नोंद न केल्यास आर्थिक मदत रोखली जावु नये ,अॅपची सक्ती करुन शासनाने शेतकर्‍यांना वेठीस धरु नये अॅपच्या समस्या संपविण्याबरोबरच पुर्वीची पीक नोंदणी प्रक्रीया कायम ठेवण्याची मागणी फडतरे यांनी निवेदनाद्ववारे राज्यशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!