ताज्या घडामोडी

गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात कन्यादान साडी भेट सरपंच अशोक कुंभार यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
कोकरूड ता शिराळा येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक , ग्रामीण कथाकार व वारणा कोतोली चे सरपंच अशोक कुंभार यांनी गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात स्वखर्चाने दोन हजारांची कन्यादान साडी भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे .आतापर्यंत त्यांनी पाच मुलींच्या लग्नात साड्या भेट दिल्या असून त्यांच्या या समाजशील उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शिक्षक अशोक कुंभार यांची वारणा कोतोली ता शाहूवाडी गावच्या सरपंच पदी 30 डिसेंबर 2021 रोजी निवड झाली .त्यांना एक वर्षाचा कार्यकाल मिळाला असून या अवधीत आदर्शवत काम करण्याचा निर्धार कुंभार यांनी केला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून त्यांनी गावातील कोणत्याही मुलीच्या लग्नात स्वखर्चाने 2000 रुपयांची कन्यादान साडी लग्नात जावून भेट देण्याचा उपक्रम राबविला आहे. आतापर्यंत अनेक मुलींच्या लग्नगावी जावून ही अनोखी भेट दिली आहे. शिवाय गावातील आजी माजी सैनिकांचा नामफलक ग्रामपंचायतीत लावून त्यांचा गौरव केला आहे. ग्रामपंचायत डिजिटल करणे,वेब कॅमेरा बसविणे,जेष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करणे,.ई श्रमिक योजना राबविणे,स्मशानभूमी अद्यावत करणे तसेच व्यसनमुक्ती असे अनेक उपक्रम सरपंच अशोक कुंभार यांनी हाती घेतले आहेत.

गावच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मिळालेल्या सरपंच पदाच्या संधीचा पुरेपुर वापर करून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा माझा प्रयत्न राहिल. “गाव माझा, मी गावचा ” ही संकल्पना नसानसात रूजविण्याचे आटोकाट प्रयत्न करणार आहे-
अशोक कुंभार , सरपंच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!