ताज्या घडामोडी

वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या येलूर हायस्कूल,येलूर मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण

Spread the love

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मिळालेल्या नुतन आय. सी. टी. लॅब चा व शाळेच्या स्थळ दर्शक डिजीटल नकाशाचा उदघाटन समारंभ शाळेचा माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक मा.श्री.विकास जगदाळे (सांगली) यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सह सचिव ॲड्.धैर्यशील पाटील (बाबा) हे होते.शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.एम्.एल्.जाधव सर व माजी विद्यार्थी व साधनव्यक्ती पंचायत समिती इस्लामपूर श्री.प्रविण पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री.एस.एल.पाटील सर (मुख्याध्यापक) यांनी केले.पाहुण्यांची ओळख श्री.एस.डी.यादव सर यांनी करून दिली.श्री.एम.एल.जाधव सर व श्री.प्रविण पाटील यांची भाषणे झाली.श्री.विकास जगदाळे यांनी आपण गरीब परिस्थितीतून शिक्षण घेवून प्रामाणिक कष्टाच्या जोरावर उत्तुंग यश कसे मिळवले.हे विद्यार्थ्यांना सांगितले.एक काम शोधणारा मुलगा अगदी कमी वयामध्ये प्रामाणिक कष्टाच्या जोरावर एका कंपनीचा मालक होवू शकतो.ते त्यांनी मुलांना पटवून दिले.शाळेची एकूण पाहणी करून ज्या शाळेनं मला बोलायला शिकवलं त्या शाळेच्या भिंती बोलक्या असाव्यात. ह्या उद्देशाने त्यांनी शाळेच्या भिंती बोलक्या करण्याकामी शाळेला रू.५०,०००/-ची मदत रोख दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड.धैर्यशील पाटील (बाबा) यांनी श्री.जगदाळे यांच्या सारखे प्रामाणिक कष्ट व शिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले पाहिजे.असे प्रतिपादन केले.ह्या वेळी श्री.विकास जगदाळे यांचे वडील व मामा उपस्थित होते.आभार श्री.पी.एस.पाटील सर यांनी मानले व सुत्रसंचालन श्री.उत्तम शिणगारे सरांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!