आरोग्य व शिक्षण

पुरस्काराने शिक्षकांना प्रेरणा मिळते – खासदार श्रीरंग बारणे

Spread the love

कार्ला : शिक्षक वाड्यावसत्यांवर जाऊन ज्ञानदानाचे काम करतात ते जे काम करतात ते अतुलनीय असून एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम करत असतात कामाला प्रोत्साहन मिळावे शिक्षकांचा गुणगौरव व्हावा पुरस्काराने माणूस मोठा होत नसतो तर पुरस्काराने काम करणाऱ्याला प्रेरणा मिळते.व अधिक गतीने व जोमाने काम करु शकतो असे उदगार खासदार श्रीरंग बारणे यांनी कान्हेफाटा येथे काढले.

मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मावळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक असे एकूण १२५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व उपजिल्हाप्रमूख शरद हुलावळे,मावळ शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर,मावळ शिवसेना संघटक सुरेश गायकवाड,संत तुकाराम साखरकारखान्याचे माजी संचालक पांडुरंग ठाकर,मावळ विद्यार्थी आघाडी सेना अध्यक्ष धनंजय नवघणे,महिला आघाडीच्या अनिता गोणते,उपतालुका प्रमुख मदन शेडगे,चंद्रकांत भोते,देहुरोड शहर प्रमुख भरत नायडू,रोहिणी मुथा,रामभाऊ सावंत,सुदेश लाड,गिरीश सातकर,जयदास ठाकर,यशवंत तुर्डे,सोमनाथ कोंडे,योगेश खांडभोर,पोपट राक्षे,रवि गायकवाड,दत्तात्रय भेगडे,देवा खटमल,सतीश इंगवले,गणेश भोकरे,अक्षय येळवंडे,रमेश जाधव,भाऊसाहेब आगळमे,अनिता कुटे,रघूनाथ मोरमारे,संतोषी खांडभोर,भाऊसाहेब खोसे,धनंजय नांगरे,राम कदमबांडे,बापूसाहेब नवले यांंच्यासह शिवसेना पदाधिकारी व मावळ तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थितहोते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेश खांडभोर यांनी सुत्रसंचालन गणेश भोकरे आभार मदन शेडगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!