आरोग्य व शिक्षण

सिंहगड इन्स्टिट्यूटचा प्लेसमेंट मध्ये वाढता आलेख

Spread the love

लोणावळा: सुरुवातीस२९ वर्षापूर्वी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे, दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्याची उद्दिष्टे ठेवून स्थापन झाली. आजमितीस या संस्थेचा शैक्षणिक विस्तार बारा शैक्षणिक संकुलामध्ये एक लाखांच्या आसपास विद्यार्थी संख्या असा झाला आहे. मागील अनेक वर्षापासून प्लेसमेंट चे उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्यासाठी केंद्रीभूत व्यवस्थांमध्ये डीन प्लेसमेंट पद निर्माण करून विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी करून नियोजनपूर्वक प्रशिक्षण दिल्याने विद्यार्थी प्रतिष्ठित कंपन्यांच्या मुलाखतीमध्ये निवड प्रक्रियेतून यशस्वी होऊन अधिकाधिक पॅकेजच्या नोकऱ्या मिळविण्या मध्ये यशस्वी झालेले आहेत.

मागील काही वर्षाचे रेकॉर्डवरून २०१८-१९:२५२०, २०१९-२०:२५५७, २०२०-२१:२७६९ असा शिक्षण घेतानाच नोकरी मिळविण्याचा वाढता आलेख दिसतो. यावरून संस्थेच्या दर्जेदार शिक्षण कार्याची पावतीच म्हणता येईल. त्यामागे संस्थेच्या अधिकार मंडळातील सर्वांचे,विविध कंपनी अधिकारी यांचे दिशादर्शक मार्गदर्शन, सहकार्य मोलाचे आहे.

सेन्ट्रल प्लेसमेंट डीन प्रा. पितांबरे व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून हे प्लेसमेंट वाढीचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आजच्या तारखेस २०१५ विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट झाल्या असून अजूनही कामकाज सुरू आहे. या शैक्षणिक वर्षांमध्ये गतवर्षीपेक्षा कोविड -१९ मुळे रखडलेल्या अधिक प्लेसमेंट होण्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा चे प्राचार्य व संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.

विशेष म्हणजे मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या प्रत्येकी २६१ विद्यार्थ्यांना आय.टी. क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. यावर्षी कॉग्निझंट-६०६, विप्रो-२९७, ॲक्सेंचर-२९९, अमडॉक्स-१५१, टी.सी.एस.-१३०, डाटामेटीका-४५, इन्फोसिस-७६, बिर्लासॉफ्ट-३८, व रिलायन्स-३२ अशी प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या असल्याचे प्लेसमेंट सेलनी कळविले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रो.एम. एन.नवले व संस्थापक सचिव डॉ.सुनंदा नवले यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याबरोबरच उपाध्यक्ष रचना नवले-अष्टेकर व रोहित नवले यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!