आरोग्य व शिक्षण

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी राजेश गायकवाड

Spread the love

लोणावळा : मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष राजेश गायकवाड यांची पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राजेश गायकवाड गेली 27 वर्षे मुख्याध्यापक पदावर काम करीत आहेत. गेली सात वर्षे मावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळत आहेत.

मावळ तालुक्यातील शाळा,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,मुख्याध्यापक यांच्या समस्या सोडवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे.विविध शासकीय योजनांची माहिती असणारे राजेश गायकवाड यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून जिल्हा संघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

गायकवाड यांना शिक्षण क्षेत्रातील विविध अधिकारी पदाधिकारी यांनी या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!