आरोग्य व शिक्षण

वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत अद्याप संभ्रमावस्था शिक्षकात संताप

Spread the love

सांगली दि. २०:राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, अध्यापक विद्यालयातील पात्र शिक्षकांचे वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण झाली असून प्रशिक्षण कधी आयोजित करण्यात येणार असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेने ९४हजार शिक्षकांचे प्रशिक्षण शुल्क भरून नोंदणी केली आहे. वारंवार प्रशिक्षणासाठी जाहिर करूनही प्रशिक्षण सुरू झाले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या भोंगळ कारभारावर शिक्षकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रशिक्षणाबाबत ‘ईगल न्यूज ‘चॅनेलने २७आँक्टोबर २०२१रोजी ‘वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत फक्त आश्वासन ‘ अशी बातमी प्रकाशित केली होती. प्रशिक्षण शुल्क माफ करण्याची मागणी केली होती व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या माध्यमातून संचालक एम. डी. सिंह यांच्याकडे प्रशिक्षण जाहीर करण्यासाठी पाठपुरावा केला. वृत्ताची दखल घेऊन प्रशिक्षण शुल्क भरून नोंदणी झाली आणि प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यातील त्रुटीबाबत शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत असे कळते. प्रशिक्षण आँनलाईन प्रशिक्षण १५मे२०२२ते १४जून २०२२अखेर होणार असल्याचे संकेतस्थळावर जाहिर करण्यात आले मात्र स्थळ, वेळ प्रत्यक्ष उपस्थिती,प्रशिक्षणाबाबतची माहिती ई-मेल द्वारे, मोबाईलद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती दिली जाणार होती. तशी माहिती अद्यापही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे या प्रशिक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
जून महिन्यात शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांना तयारीची कामे करावी लागणार आहेत. मे महिना संपत आला तरी प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत तरी प्रशिक्षण दिले जाणार आहे का नाही हे स्पष्ट करण्यात यावे असे मत सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा सुरेश भिसे सचिव प्रा दिलीप जाधव यांनी व्यक्त केले व प्रशिक्षण परिषद संस्थेने तारखा जाहीर करण्याबाबतचे निवेदन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेचे संचालक एम. डी. सिंह यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!