ताज्या घडामोडी

शाळा पूर्वतयारी अभियान यशस्वी करूया : तमेजबी अत्तार

Spread the love

कोकरूड : प्रतिनिधी

येत्या शैक्षणिक वर्षात पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी करून अभियान यशस्वी करूया.जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि दर्जा उंचावूया असे आवाहन तमेजबी अत्तार यांनी केले.

येळापूर (ता. शिराळा) येथे शिक्षकांचे केंद्रस्तरीय शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षण संपन्न झाले यावेळी मार्गदर्शन करताना तमेजबी अत्तार बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या कोरोनामुळे मुलांच्या मनात निर्माण झालेली निरसता दूर करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा पूर्व तयारी म्हणून राबविण्यात येणारे उपक्रम नक्कीच यशस्वी होणार आहेत. आजही जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता टिकून आहे. यात सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

यावेळी सुनिता पाटील यांनीही मार्गदर्शन केले. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेत वातावरण निर्मिती करणे, वेगवेगळे शैक्षणिक स्टॉल मांडणे व त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सर्व अंगणवाडी , केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा, स्थानिक पदाधिकारी सर्व पालक यांना आमंत्रित करून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उपक्रमाचे कौतुक केले.

गटशिक्षण अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी विष्‍णु दळवी, केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे, आलिशा मुलाणी, सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!