आरोग्य व शिक्षण

शिक्षक आमदार बाळाराम पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रिंटर

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
ठाणे येथे कोकण शिक्षक मतदार संघ विधान परिषद आमदार बाळाराम पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या स्थानिक विकास निधी मधून ठाणे जिल्ह्यातील ९१० अनुदानित शाळांना २. ५ कोटींचे प्रिंटर वाटप करण्यात आले. आमदार बाळाराम पाटील आणि आ. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रिंटरचे वितरण केले. शाळेतील कामाला गती यावी व कामे वेळेवर व्हावीत, या हेतूने प्रिंटर्स चे वितरण करण्यात आले.

ठाणे ठाणे जिल्ह्यातील एकूण ९१० शाळांना प्रिंटर वाटप वाटप करण्यात आले. आमदारांच्या स्थानिक विकास निधी २०२२ यामधून ठाण्यातील शाळांसाठी १९० प्रिंटर्स, तर कल्याण डोंबिवली येथील शाळांकरिता २२२ प्रिंटर्स चे वाटप केले. तसेच उल्हासनगर तालुक्यासाठी ८०, अंबरनाथ – ८५, भिवंडी – १०५, नवी मुंबई – १९६, मुरबाड – ३६, शहापूर – ६३, आणि मीरा-भाईंदर करिता ३३ प्रिंटर्स चे वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!