ताज्या घडामोडी

केळी क्लस्टर अंतर्गत केळी निर्यातीस चालना

Spread the love

कृषि निर्यात धोरण अतंर्गत अपेडा, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २९ मार्च २०२२ रोजी हुपरे मल्टिपर्पज हॉल, कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे निर्यातक्षम केळी उत्पादन व निर्यातवृध्दी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन मा. श्री. मकरंद कुलकर्णी, उपविभागीय कृषि अधिकारी, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी श्री. अरुण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री. श्रीकांत माळी, श्री. किरण माळी, डॉ. जयवंत जगताप, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, तळसंदे, डॉ. विष्णु गरांडे, सहयोगी प्राध्यापक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, पुणे, श्री. सुरेश मगदुम, जैन एरिगेशन जळगांव, डॉ. सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक, कृषि पणन मंडळ, श्री. जितेंद्र शिंदे, व्यवस्थापक, कृषि पणन मंडळ इ. उपस्थित होते.

सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. मकरंद कुलकर्णी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केळी हे पिक उसाला पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे नमुद करुन केळी क्लस्टर अंतर्गत शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या पुढे येण्याचे गरज असल्याचे सांगीतले व कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. तसेच केळी उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान याबाबत डॉ. जयवंत जगताप यांनी मार्गदर्शन केले. केली पिकातील सुगी पश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया या संदर्भात डॉ. विष्णु गरांडे, केळी पिकाची निगा व काढणी याबाबत श्री. सुरेश मगदुम, पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत डॉ. सुभाष घुले व केळी पिकाची पणन व्यवस्था याबाबत श्री. जितेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!