ताज्या घडामोडी

तिरंगा स्तंभाच्या माध्यमातून हर घर तिरंगा जनजागृती मोहिमेस प्रारंभ

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावाचे औचित्य साधून राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन विभागातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने माधवराव पाटील महाविद्यालयात शुक्रवारी (ता.१२) रोजी आयोजित ‘तिरंगा स्तंभ’ भितीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सतिश शेळके, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. किरण राजपूत, डॉ. सुजित मटकरी, डॉ. सुशिल मठपती, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सायबण्णा घोडके, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. विनायक रासुरे, डॉ. मुकूंद धुळेकर, डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. राम बजगिरे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. सोमनाथ व्यवहारे, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा कुमारी शुभांगी कुलकर्णी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सायबण्णा घोडके यांनी केले. संपादक मंडळातील मनोज हावळे, योगेश पांचाळ, अमोल कटके, अंबिका पाताळे, प्रगती कुलकर्णी, पुजा शिंदे, शुभांगी कुलकर्णी, माजी विद्यार्थी आप्पाराव चव्हाण आदिंनी स्तंभ लेखनात राष्ट्रध्वज तिरंगा, संविधान व पार्श्वभूमी या विषयावर सविस्तर लेखन करुन अभियानात पुढाकार घेतला. डॉ. महेश मोटे यांनी राष्ट्रध्वज आणि भारतीय संविधान याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. उद्‌घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी तरुणांनी हर घर तिरंगा या अभियानात जास्तीत-जास्त युवकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. योगेश पांचाळ यांनी राष्ट्रध्वजाबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमर कटके तर आभार मनोज हावळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!