ताज्या घडामोडी

डॉ.के.जी माळी यांना ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय ‘गरुडझेप’पुरस्कार जाहीर

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर

कोकरुड ता. शिराळा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ चे पशुधन विकास अधिकारी डॉ.के.जी.माळी यांच्या पशुवैद्यकीय सेवेच्या विशेष योगदानाबद्दल ईगल फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय ‘गरुडझेप’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. के.जी.माळी यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रात गेली ३२ वर्षे सचोटीने, प्रामाणिकपणाने कार्यरत आहेत.त्यांच्या पशुवैद्यकीय सेवेतील विशेष दखल घेत ईगल फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्टीत सन २०२२ चा ‘राष्ट्रीय गरुडझेप’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी आत्तापर्यंत पशुधन विकास अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघांत, दाभोळ रत्नागिरी, एटापल्ली गडचिरोली, चरण ,बिळाशी येथे चांगल्या प्रकारे पशुवैद्यकीय सेवा दिली आहे.

शिराळा तालुका डोंगर दऱ्याखोऱ्याने व्यापलेला आहे . यामुळे या परिसरात सातत्याने बिबटे,गवे,तरस अण्य वण्य प्राणी शेतशिवारातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करत असतात.यावेळी तातडीने जाऊन या प्राण्यांवर उपचार करतात.तसेच मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई साठी सहकार्य करतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणी अडचणी येतात तरीही डॉ.के.जी.माळी प्रत्येक वाडी- वस्तीवर रात्री अपरात्री अत्यावश्यक पशुवैद्यकीय सेवा देत आहेत. गावा- गावात सातत्याने पशुवैद्यकीय शिबीरे आयोजित करुन शेतकऱ्यांना मोफत पशुवैद्यकीय औषधे देऊन मार्गदर्शन करत असतात. सन २०१९ व २०२१ मध्ये शिराळा तालुक्यात आलेल्या महापुरामुळे सर्व जण जीवन विस्कळीत झाले होते.अशावेळी शिराळा तालुक्यातील बहुतांश पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त असतानाही डॉ.के.जी.माळी यांनी व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी पुरग्रस्त सर्व गावातील जनावरांना घटसर्प व फऱ्या रोग प्रतिबंध लसीकरण शिबीरे, उपचार शिबीरे आयोजित करुन शेतकऱ्यांना सहकार्य केले होते.
याचीच दखल घेऊन दि.३ एप्रिल रोजी गणपतीपुळे येथे भव्य कार्यक्रमात त्यांना ईगल फौंडेशनचा मानाचा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.त्यांना जाहीर झालेल्या पुरस्कारा बद्दल परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!