ताज्या घडामोडी

*प्रा. डॉ. दत्तात्रय नेरकर याना राष्ट्रीय पातळीवरील ‘ उत्कृष्ट आय. क्यू. ए. सी. समन्वयक’ पुरस्कार प्रदान

Spread the love

साठ्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय नेरकर यांना ठाकूर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्कार समारंभामध्ये राष्ट्रीय स्तरावरील मानाचा समजला जाणारा ‘उत्कृष्ट आय. क्यू. ए. सी. समन्वयक’ हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुधीर पुराणिक, ठाकूर शैक्षणिक संस्थेचे सचिव श्री. ठाकूर जितेंद्र सिंह, प्राचार्य डॉ. चैताली चक्रवर्ती, ट्रस्टी रमेश ठाकूर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. मुंबईतील ललित हॉटेल मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात देशभरातील शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या विभागात आणि वेगवेगळ्या स्तरांवर महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या 24 विद्वानांचा सत्कार करण्यात आला. या विशेष उपलब्धीबद्दल प्रा. डॉ. नेरकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!