क्रीडा व मनोरंजन

ओम् कबड्डी प्रबोधिनीचा १८वा वर्धापन दिन व सन्मान सोहळा २एप्रिलला.

Spread the love

जेष्ठ खेळाडू सुषमा चेंबूरकर, लीला पाटील, सुनील डकरे, सुरेश मोरे यांचा होणार सन्मान

वसंत ढवण, जगन्नाथ वलखाडे यांचा होणार विशेष गौरव.

मुंबई :- ओम् कबड्डी प्रबोधिनीचा “१८वा वर्धापन दिन व खेळाडू सन्मान सोहळा” शनि.दि. २एप्रिल २०२२ सायं.६-३० वा. आयोजित करण्यात आला आहे. सनपॅरेडाईझ बिजनेस प्लाझा, ६वा मजला, कमला मिल समोर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ येथे होणाऱ्या या सोहळ्यात २महिला व २पुरुष खेळाडूंचा स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. जेष्ठ महिला खेळाडू सुषमा चेंबूरकर(सुषमा उमेश पाटील) आणि लीला पाटील(लीला शशिकांत कोरगावकर), तर जेष्ठ पुरुष खेळाडू सुनील डकरे आणि सुरेश मोरे हे यंदाच्या वर्षातील गौरवमूर्ती आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा सोहळा घेता आला नव्हता.

यंदा दोन विशेष पुरस्कार देखील देण्यात येणार आहेत. त्यात वसंत ढवण आणि रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू आणि हाडवैद्य म्हणून कबड्डी जगतात सातत्याने सेवा देणारे जगन्नाथ(मामा) वलखाडे यांचा सन्मान होणार आहे. भारतश्री व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजू पेणकर, विभागीय आमदार अजय चौधरी व सुनील शिंदे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून आमचा व सन्मानमूर्तीचा उत्साह वाढवावा. असे आव्हान या पत्राद्वारे प्रबोधिनीचे सरचिटणीस जीवन पैलकर यांनी प्रसिद्धी माध्यमा मार्फत सर्वांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!