महाराष्ट्र

आमदार सुनिल शेळके यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेबजी दानवे यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट

Spread the love

आमदार सुनिल शेळके यांनी  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेबजी दानवे यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी नवीन खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्या समवेत सिन्नर विधानसभेचे आमदार मा.माणिकराव कोकाटे उपस्थित होते.


#मावळ तालुक्यातील कान्हे व मळवली येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. सद्यस्थितीत सदर उड्डाणपुलाचे काम रेल्वे प्रशासनामार्फत करण्याचे निश्चित झालेले आहे.परंतु रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. LC-45 कान्हे व LC-36A मळवली येथील रेल्वे उड्डाणपुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी विनंती केली.यावर संबंधित विषयाची माहिती घेऊन योग्य ते आदेश अधिकाऱ्यांना देण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!