ताज्या घडामोडी

ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलची विजयी सलामी दिलीप करंगुटकर स्मृती क्रिकेट

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, क्रिकेटप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेची उद्घाटनीय लढत जिंकताना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने रिलायन्स हॉस्पिटलचा ६३ धावांनी पराभव केला. अष्टपैलू सुदेश यादव, समीर मेहेंदळे व स्वप्नील कांबळे यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा विजय सुकर झाला. संदीप देशमुख व मिल्टन लोबो यांनी डावाच्या मध्यापर्यंत रिलायन्स हॉस्पिटलच्या विजयी आशा जिवंत ठेवल्या होत्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी संजय नाईक, जॉइंट सेक्रेटरी शाहआलम शेख, माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक दीपक पाटील, कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अभिजित घोष, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळीनी उद्घाटनप्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

नाणेफेक जिंकून क्रॉस मैदानात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. कप्तान प्रदीप क्षीरसागर (१८ चेंडूत १२ धावा) व सुदेश यादव (२१ चेंडूत २१ धावा, ३ चौकार) यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची तर समीर मेहेंदळे (२४ चेंडूत ३४ धावा, २ षटकार व २ चौकार) व स्वप्नील कांबळे (३१ चेंडूत ३२ धावा, ४ चौकार) यांनी सहाव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १३६ धावा फटकाविल्या. मध्यमगती गोलंदाज अजित गिरीने २१ धावांत ३ बळी घेतले.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना प्रारंभ निराशाजनक होऊनही संदीप देशमुख (१५ चेंडूत ३४ धावा, ४ चौकार) व मिल्टन लोबो (१० चेंडूत १५ धावा, १ चौकार) यांनी रिलायन्स हॉस्पिटलचां डाव दहाव्या षटकाला ३ बाद ५५ धावा असा सावरला. परंतु त्यानंतर मध्यमगती गोलंदाज सुदेश यादव (१२ धावांत ४ बळी), ऑफ स्पिनर सुनील बांदवलकर (१८ धावांत २ बळी) व लेग स्पिनर प्रदीप क्षीरसागर (१६ धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी करून रिलायन्स हॉस्पिटलचा डाव १५ व्या षटकाला ७३ धावसंख्येवर गुंडाळला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!