आरोग्य व शिक्षण

नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे – मावळ‌ भाजपाची मागणी

Spread the love

वडगाव : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना अटक झाली असून मालिकांचे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे त्यामुळे तातडीने नवाब मालिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज भारातीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने वडगांव येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

ज्या दाऊद इब्राहिम ने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले, वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे,मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर,मा.उपसभापती शांताराम बापु कदम,मा.उपसभापती दत्तात्रय भाऊ शेवाळे,ता.सरचिटणीस सुनील भाऊ चव्हाण,ता.सरचिटणीस मच्छिंद्र भाऊ केदारी,वडगांव नगरपंचायत चे नगरसेवक प्रवीण भाऊ चव्हाण,युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश भाऊ ठाकर, विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु भाऊ शिंदे,सहकार आघाडी अध्यक्ष अमोल भाऊ केदारी,वडगाव शहर अध्यक्ष अनंता भाऊ कुडे,कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण भाऊ शिंदे,वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भाऊ भेगडे,नामदेव भाऊ भसे,अमोल भाऊ धिडे,संस्कार चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!