ताज्या घडामोडी

फुपेरे सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री भगवान रामचंद्र गायकवाड आणि व्हा.चेअरमनपदी प्रसाद बाबू साळुंखे यांची निवड

Spread the love

अशोक जाधव, चिंचोली.

फुपेरे ता.शिराळा, जि. सांगली येथे फुपेरे सेवा सोसायटीच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड झाली असून या सोसायटीच्या चेअरमन पदी भगवान रामचंद्र गायकवाड आणि व्हा.चेअरमन प्रसाद बाबू साळुंखे
यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
तर सदस्य म्हणून पांडुरंग केशव गायकवाड, मारुती दादू गायकवाड, वसंत दगडू गायकवाड, प्रताप गोपाळ पाटील, शामराव यशवंत पाटील, मिनानाथ आनंदराव पाटील, मच्छिंद्र बंडू शिवमारे, मंगल नानासो गायकवाड, लक्ष्मी अशोक गायकवाड
या सर्वांची निवड केली आहे.
यावेळी निर्णय निवडणूक अधिकारी श्री.पी आर पाटील व विष्णू पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी फुपेरे गावचे ग्रामस्थ सर्जेराव गायकवाड,जयसिंग गायकवाड, शिवाजी हवालदार,अशोक पाटील, बापू नाना पाटील,बबन गुंडा गायकवाड, पप्पू सुतार,नारायण पाटील,आनंद गायकवाड, सर्जेराव शिवामारे,बाळू पाटील,दादासो पाटील आणि पै. शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!