ताज्या घडामोडी

गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर याच्या कडून प्रा.वैभव खानोलकरांच्या प्रभावी सुत्रसंचालनाचे कौतुक

Spread the love

आपल्या अभ्यासपुर्ण सुत्रसंचालनासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे सिधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र
प्रा.वैभव खानोलकर याच्या सुत्रसंचालनाने गोवेकरांनाही भुरळ पडली आणि खुद्द गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हि प्रा.खानोलकर यांचे कौतुक करत शाल सन्मान चिन्ह प्रदान करत त्याचा गौरव केला.
कोरोना काळानंतर सार्वजनिक कार्यक्रमावरचे निर्बंध हटवल्यानंतर पर्यटना साठी प्रसिध्द असणाऱ्या गोवा राज्यात पर्यटन महोत्सवाचे कार्याक्रमाचा दिमाखदार सोहळा गोव्याची राजधानी पणजी येथे नुकताच संपन्न झाला.विविध लोककला आणि विविध प्रांतातील कर्तृत्व संपन्न व्यक्तीमत्वाचा गौरवही या महोत्सवात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर याच्या हस्ते केला गेला.
या सपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिधुदुर्गाचे सुपुत्र, उपक्रमशील अध्यापक ,युवावक्ते ,दशावतार लोककला अभ्यासक आणि सुप्रसिद्ध निवेदक प्रा.वैभव खानोलकर यांनी करत आपल्या अभ्यासपुर्ण निवेदनातुन आणि ओघवत्या शैलीतुन व्यासपीठा वरील मान्यवर उपस्थित रसिका सह गोवा राज्यांचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांचे ही मन जिकत वाहवा मिळवली.
गोव्याचा इतिहास आणि विविध संस्कृतीचा मिलाफ असणारे गोवा या विषयीचा समग्र आढावा घेताना गोव्यातील नर रत्ने व त्याची विश्वव्यापी कामगिरी याचे वर्णन गोवेकरांना विशेष भावले.पर्यटन क्षेत्रात देशाला समृध्दता देणाऱ्या गोव्या राज्यातील काही कर्तृत्व संपन्न व्यक्तीसोबतच महाराष्ट्रातील आणि गुजरात प्रांतातील विविध कर्तत्ववान व्यक्तीनी केलेली कामगीरीचा गौरव संमारंभ ही याच वेळी संपन्न झाला.
आपल्या अभ्यासपुर्ण सुत्रसंचालनातुन सिधुदुर्गाची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रा.खानोलकर यानी अनेक वेळा विंविध राज्यस्तरीय कार्यक्रमात आपले वेगळेपण सिध्द करत अनेक दिग्गज मान्यवरांची मने जिंकली आहेत अशा या युवा सुत्रसंचालकाचे कौतुक सर्व स्तरातुन होत असुन त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या वेळी व्यासपीठावर स्वराज्यरक्षक संभाजी या कार्यक्रमातील सुप्रसिद्ध अभिनेता विश्वजित पडते यांची ही प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!