क्रीडा व मनोरंजन

15 वर्षाखालील मुलींची क्रिकेट निवड चाचणी 11 ऑक्टोबर रोजी

Spread the love

महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत 15 वर्षाखालील मुलींची निवड चाचणी मंगळवार दिनांक 11/ 10/ 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक मुलींनी या निवड चाचणी साठी सकाळी 8.00वा. हजर रहावे. सोबत स्वतःचे क्रिकेट साहित्य, क्रिकेट गणवेश, आधार कार्ड झेरॉक्स, जन्म दाखला झेरॉक्स, व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे बंधनकारक आहे. निवड चाचणी फी दोनशे रुपये राहील. ज्या मुलींचा जन्म 1/9/2007 नंतर झाला असेल व 31/8/2009 आधी झाला असेल अश्या मुलींना या निवड चाचणीत भाग घेता येतील.
तरी जास्तीत जास्त या निवड चाचणीला मुलींनी सहभाग घ्यावा असे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असो. अध्यक्ष किरण सामंत, सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी व सर्व पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!