ताज्या घडामोडी

भाजपाने घातला जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात…!

Spread the love

कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता भाजपाने मतदारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला आहे. कोल्हापूर शहर होऊ घातलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक काँग्रेसचा एकतर्फी विजय असे वाटले होते. पण भाजपाने फार मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपाने थेट जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालून मतदारांना विकासासाठी सत्यजित कदम यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर शहरात होत असलेल्या गॅस पाईपलाईनचा प्रश्न, पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न, थेट पाईपलाईनचा प्रश्न असो असे प्रश्न जनतेसमोर घेऊन भाजपा जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलित समाजाला न्याय देण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारने केली आहे. रामदास आठवले यांच्या रूपाने दुसरा दलित मंत्री करण्याचे भाग्य भाजपने केले असल्याचे भाजपाचे नेते आवर्जून सांगताहेत. कोल्हापूर शहरातील गॅस लाईनचा प्रश्न का रखडला? असा प्रश्न भाजपाने केला आहे. महापालिकेत सत्ताधारी पक्षाने गॅस पाईपलाईनचा ठराव न दिल्याने हा प्रश्न रंग आहे, असा आरोप भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी केला आहे. तसेच थेट पाईप लाईनचे काय झाले? असा सवाल केला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी तेथील मंत्र्यांचे काय काम आहे? असा सवाल करून मतदारांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. ही निवडणूक सहानभूतीवर नसून विश्वासावर आणि विकासावर लढली जात असल्याचे भाजपाचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. पंढरपूरमध्ये होती ना सहानुभूती तेथील मतदारांनी समाधान अवताडे यांना निवडून देऊन महाराष्ट्राचा दाखवून दिले आहे की आम्ही सहानुभूतीच्या मागे नसून विकासाच्या बाजूने आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल, असा आशावाद भाजपा नेत्यांना आहे. जर हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून गेला तर भविष्याची राजकीय समीकरणे बदलू शकतात हे मात्र तितकेच महत्त्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!