ताज्या घडामोडी

पालशेत नं१ आहे आदर्श प्रशालेचे विद्यार्थी आज झळकणार कलर्स मराठी वाहिनीवर

Spread the love

भाग्य दिले तू मला” मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्या समवेत मिळाली अभिनयाची संधी

गुहागर (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील जि.प.च्या पालशेत नं१ आदर्श प्रशालेचे विद्यार्थी ४एप्रिल पासून प्रारंभ होणा-या कलर्स मराठी वाहिनीवरील “भाग्य दिले तु मला” या मालिकेत झळकणार आहेत. सदर मालिकेचे चित्रीकरण नुकतेच पालशेत नं१प्रशाला व पालशेत परिसरात संपन्न झाले त्यावेळी शालेय विद्यार्थी व प्रशिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी अभिनेत्री तन्वी मुंडले, जेष्ठ दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, दिग्दर्शक सागर खेऊर कलर्स मराठी वाहिनीचे कार्यकारी निर्माता मयुरेश वाघे, बालकलाकार पृथा सैदाणें, रोमांच देवळेकर व टीमचे स्वागत केले महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेमध्ये रत्नमाला ही व्यक्तिरेखा साकारणार असून त्यांच्यासोबत अभिनेता विवेक सांगळे अभिनेत्री तन्वी मुंडले, जान्हवी किल्लेदार प्रमुख भूमिकेत असणार आहेत प्रशालेतील ओवी चव्हाण, श्रावणी हेदवकर, स्वराजराजे राशिनकर, सेजल साळुंके व अन्य सहकारी विद्यार्थ्यांना या चित्रिकरणात अभिनय संधी मिळाली आहे
एकीकडे स्वतःची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय घडेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे “भाग्य दिले तू मला” विराट इंटरटेनमेंट निर्मित ही मालिका सुरू होत असलेली मालिका ४ एप्रिल पासून सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे सदर मालिकेत शालेय विद्यार्थ्यांना अभिनयासाठी संधी मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतिष चव्हाण, उपाध्यक्ष प्रित पटेकर मुख्याध्यापिका दर्शना समगिस्कर, उपशिक्षक संतोष गावडे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर केंद्रीय प्रमुख श्रीकांत वेल्हाळ शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे, चिंतामणी गायकवाड प्रभारी गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, सर्व शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक संघ, शिक्षक पालक संघ व पालक बंधु भगिनींनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे
निर्मात्या कश्मिरा पठारे यांच्या विराट इंटरटेनमेंट निर्मिती संस्थेतर्फे कलर्स मराठी चे अनिकेत जोशी आणि विराज राजे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या मालिकेची अमोल पाटील हे पटकथा करत असून चैतन सैंदाणे संवाद लिहीत आहेत आणि दिग्दर्शन सागर खेऊर सांभाळत आहेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!