ताज्या घडामोडी

इन्फोसिस फाऊंडेशन पुणे तर्फे जाशी शाळेला चार संगणक भेट

Spread the love

दहिवडी : माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाशी या शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ खाडे यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी व तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण व मनोरंजक अध्यापनासाठी संगणक उपलब्ध करून द्यावेत यासाठी सर्व माहितीसह प्रस्ताव पुणे येथील इन्फोसिस या नामांकित आयटी कंपनीकडे सादर केला होता. या प्रस्तावाचा विचार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता बाढावी व भावी संगणक इंजिनियर तयार व्हावेत यासाठी इन्फोसिस या नामांकित आयटी कंपनीने जाशी सारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला चार संगणक भेट म्हणून दिले आहेत. यासाठी पळशीचे सेवानिवृत्त पी.एस. आय. कांता कुलकर्णी, सहा. गटविकास अधिकारी भरत चौगले साहेब, गटशिक्षणाधिकारी लाभले. माणिक राऊत, शि. वि. अधिकारी सोनाली विभुते, रमेश गंबरे, संगीता जाधव, केंद्रप्रमुख नारायण आवळे तसेच इन्फोसिस कंपनी तर्फे संगणक मिळून देण्याकरीता प्रवीण कुलकर्णी प्रिती बुधिया, अनमोल खोपडे, मनिषा भोसले, मिलिंद इंगुळकर, रोहित कुसनाळे वसुधा देशपांडे, सुजाता धुमाळ, आदीचे सहकार्य स्तरावरच कंपनीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी अंदाजे ५० ते ६० हजार रुपये किमत असणारे संगणकाचे वाटप करून यातुन उद्याचे भावी संगणक इंजिनियर तयार व्हावे अशा कंपनीच्या अधिकान्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या व प्राथमिक विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी व मोबाईल बरोबरच संगणक हाताळण्यास शिकवावे याकरिता शिक्षकांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांना संगणकाविषयी माहिती द्यावी असे आवाहनही यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केले. शाळेच्या वतीने यावेळी संगणक भेट दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!