ताज्या घडामोडी

श्री सिद्धिविनायक सहकारी गृह निर्माण संस्थे मार्फत मुस्लिम बांधवाना ‘ जश्ने ईद मिलादून नबी’ च्या शुभेच्छा

Spread the love

मुंबई मधील कांदिवली पश्चिम उपनगरात सार्वजनिक सेवा समिति चा ळ के.डी.कंपाऊंड, गांधी नगर,येथील श्री सिध्दीविनायक सहकारी गृह निर्माण संस्थेच्या पदाधिकारी ,सभासद, सदस्य,व्दारे या विभागातील मुस्लीम बांधवांना ‘ जश्ने ईद मिलादून नबी’ त्यौहारच्या शुभेच्छा ,मुबारक देण्यात आल्या.श्री सिध्दीविनायक सहकारी गृह निर्माण संस्था या विभागात सन २००५ पासून कार्यान्वित असून या ठिकाणी सन १९९२ ९३ च्या दंगली दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार,गैर प्रकार घडला नाही दंगलीची झळ या ठिकाणी पोहचली नाही. कारण येथील हिंदू मुस्लिम भाई यांनी एकत्रीत येऊन दंगलीचे लोण येथे पोहचू दिले नाही.या मध्ये श्री सिद्धिविनायक सहकारी गृह निर्माण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे.संस्था व विभागातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन वारंवार बैठका ,सभा घेऊन दंगली परतून लावल्या.तसेच या विभागात हिंदू व मुस्लिम बांधव एकमेकांच्या लग्न सोहळ्यात ,सणावेळी सहभागी होतात,तर ईद,सारख्या सणात हिन्दू बांधव एकत्र येऊन सामील होऊन शुभेच्छा, मुबारक देतात.येथील गणेशोत्सव, नवरात्रि सारख्या सार्वजनिक उत्सावात मुस्लिम बांधव आनंदा ने सामील होतात.येथे हिन्दू मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात.या विभागात सातत्याने शांतता राखण्यासाठी संस्थाचे अध्यक्ष विजय पाल महासचिव भारत कवितके, उपसचिव डी.आर.पाठक,दिवानसिंह सौन,जमाल शेख,अल्लीमुला सिध्दिकी,रमजान शेख आफताब अन्सारी,आनंदा आमते,हुसेनभाई,रवि राऊळ व विभागातील नागरिक नेहमीच प्रयत्नशील असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!