क्रीडा व मनोरंजन

मुलांनो मोबाईलच्या वेडातून मैदानाकडे वळलात तर आयुष्यात तंदुरुस्त जीवन जगता येईल – अर्जुन पुरस्कार माया मेहेर.

Spread the love

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या देशी खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता.

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई :- ” मुलांनो मोबाईलच्या वेडातून मैदानाकडे वळलात तर आयुष्यात तंदुरुस्त जीवन जगता येईल” असा मौल्यवान सल्ला कबड्डीतील अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ.माया मेहेर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी मुलांना दिला. शिबिरातील मुलांनी केलेली प्रात्यक्षिके पाहून त्याचे कौतुक करताना त्यांनी पालकांचे देखील आभार व्यक्त केले. दादर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यमाने दि. १८ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत शाळेच्या क्रीडांगणावर छोटा शिशु वर्ग ते इयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्याना कबड्डी, खो खो, रोप व पोल मल्लखांब हे देशी मैदानी तसेच कॅरम अशा विविध खेळांच्या बरोबरच संगीताचे देखील प्रशिक्षण दिले गेले. कोरोनाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर विद्यार्थ्यानी या उन्हाळी शिबिराचा आनंद मनमुराद लुटता आला.
या शिबिरात रोप व पोल मल्लखांबचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिक्षक वर्गाने दिले. कबड्डीचे प्रशिक्षण ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या शशिकांत राऊत, संदीप काणेकर, किसन बोटे यांच्याकडून दिले गेले. खो खो चे प्रशिक्षण परेश कडव, तर कॅरमचे प्रशिक्षण अमोल शिंदे यांनी दिले. संगीत या विषयासाठी दादर येथील मिती क्रिएशन संस्थेच्या श्रीमती उत्तरा मोने, अमेय मोने यांचे मार्गदर्शन लाभले. श्री समर्थ व्यायाम मंदिर-दादर या संस्थेच्या विद्यार्थ्यानी केलेल्या मल्लखांब प्रात्याक्षिकांनी या शिबिराची दमदार सुरुवात झाली. या शिबिराचे उदघाटन सोम. दि.१८ एप्रिल रोजी मल्लखांब मधील अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब हिच्या हस्ते करण्यात आले. तदप्रसंगी आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, सदस्य विश्वनाथ म्हात्रे उपस्थित होते.
या शिबिराची सांगता कबड्डीतील अर्जुन पुरस्कार प्राप्त माया मेहेर यांच्या हस्ते करण्यात आली. तदप्रसंगी विश्वस्त अध्यक्ष अभय सावरकर, विश्वस्त कार्यवाह शरद साटम, सदस्य विश्वनाथ म्हात्रे, मनोहर साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्याकरिता पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पार्टे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना लोखंडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम गंद्रे यांच्या सह शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!