आरोग्य व शिक्षण

शिलाटणे फाट्यावर अपघातात मरण पावलेले प्रवाशी ठाणे व मुंबईचे

Spread the love

लोणावळा : शिलाटणेच्या फाट्यावर सकाळी झालेल्या भीषण अपघातात ठार झालेले प्रवाशी ठाण्याचे व चालक मुंबईचा असल्याचे लोणावळा ग्रामिण पोलिसांकडून सांगण्यात आले.

मच्छीदेवी नथुराम तिलोक (वय-६५), महावीर किसन तिलोक (वय-४४), सिमा किसन राज ( वय-३६), शालीनी रूपनारायण तिलोक (वय-२०,सर्व रा -बी/७०६, सेक्टर नंबर -८, शांतीपार्क , मीरारोड , ( प ) ठाणे ) आणि रेहमान रिजवान अन्सारी (वय-३१, रा-११८, गोल दरवाजा , बिल्डिंग नं-७३, तळमजला, , सुकलजी मार्ग, मुंबई ) असे पाच जण अपघातात जागीच मरण पावले.

आज सकाळी ८.२० वाजता ठाण्यावरून बेंगलोरला सर्वजण फोर्ड एसकाॕट कार क्रमांक एच आर-२६,सी.के-७८०५ हीचे चालकाचे वाहनावरील नियंञण सुटून ती दुभाजकाच्या पलीकडे गेली व मुंबईला जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एम एच ४३, वाय-५१३० या कंटेनरला समोरून जोरात धडकून त्याखाली घुसल्याने कारचा चक्काचूर झाला.त्यामधे सर्वजण मरण पावले.

लोणावळा ग्रामिणचे पोलिस, पेट्रोलींगचे पथक,देवदूत , स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य करण्यात येवून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली मृतांची ओळख पटवून नातेवाईक यांना बोलावून घेण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईक यांचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक निलेश माने व सहकारी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!