ताज्या घडामोडी

बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद खंडाळा संघटनेच्या अध्यक्षपदी भाई जाधव तर सभापतीपदी रजत पवार यांची निवड

Spread the love

जाकादेवी/संतोष पवार
रत्नागिरी तालुक्यातील वाटद- खंडाळा दीक्षाभूमी येथील बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नुतन अध्यक्षपदी वाटद गावचे धडाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनिल उर्फ भाई जाधव यांची निवड करण्यात आली .

सभापती पदावर मालगुंड गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रजत पवार यांची निवड करण्यात आली.बावीस खेडी बौद्धजन संघाच्या विशेष सभेचे आयोजन दीक्षाभूमी बुद्ध विहार वाटद खंडाळा येथे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नुतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तसेच बौद्धजन पंचायत समिती गाव शाखा वाटद पश्चिमचे विद्यमान अध्यक्ष भाई जाधव यांची ,सभापतीपदी मालगुंडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रजत रघुनाथ पवार , कोषाध्यक्षपदी कळझोंडीतील पत्रकार किशोर पवार यांची तर सचिवपदी वाटदचे स्वप्निल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
सहचिटणीस म्हणून प्रशांत मोहिते (जयगड) आणि मंगेश पवार ( कासारी) यांची नियुक्ती झाली.
संघटनेच्या उपसभापती निवृत्त माजी सैनिक आर .डी. सावंत तर संघटनेच्या उपाध्यक्षपदी भालचंद्र कांबळे ( आगरनरळ)आणि राजन जाधव ( साखरी जयगड) तर हिशोब तपासणीस म्हणून गडनरळ येथील जेष्ठ कार्यकर्ते धर्मदास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये दिनेश कदम (निवेंडी,) वरवडे गावचे युवा नेते कुलदीप जाधव ,राहुल जाधव (सैतवडे,)विश्वास जाधव (भगवतीनगर) इ. नियुक्ती करण्यात आली.एकूणच बावीस खेडी बौद्धजन संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा व नियुक्ती आणि विशेष सभेचे आयोजन संघटनेचे माजी अध्यक्ष शरद रामचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष व सामाजिक व धार्मिक चळवळीचे नेते प्रकाश रामचंद्र पवार, तालुक्याचे कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संघटनेच्या महिला अध्यक्षा संचिता पवार, सामाजिक कार्यकर्ते ‌राजेश जाधव यांसह २२ खेडी संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, शिक्षक वर्ग, गाववार प्रतिनिधी उपस्थित होते.नुतन कार्यकारिणीचे २२ गावांतून अभिनंदन होत आहे.सामाजिक व धार्मिक चळवळीला गतिमानता आणण्यासाठी आपली कार्यकारिणी कटिबद्ध असल्याचे नुतन अध्यक्ष भाई जाधव , सभापती रजत पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!