महाराष्ट्र

राज्यसभेत घोडेबाजार? ‘तिसऱ्या’साठी भाजपला हवीत १३ मते.     

महाविकास आघाडी एकसंघ राहणार का? संभाजीराजे यांची भूमिका काय असेल? आणि भाजप नेमकी कोणाची मते फोडणार? याकडे लक्ष लागले आहे.

Spread the love

राज्यसभेत घोडेबाजार? ‘तिसऱ्या’साठी भाजपला हवीत १३ मते                                                                    महाराष्ट्र : भारतीय जनता पार्टीने राजकीय खेळी करीत राज्यसभेसाठी आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला आहे.
शिवसेनेची कोंडी करण्यासाठी कोल्हापूरमधील माजी खासदार धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली आहे. संख्याबळानुसार तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला १३ मतांची अवश्यकता आहे. त्यामुळे यासाठी घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर, भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे.

त्यात भाजपचे १०६, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदारांचा समावेश आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत.
संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’चा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर, भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. भाजपला तिसऱ्या जागेसाठी १३ मतांची गरज आहे.

त्यासाठी मतांची फोडाफोडी करावी लागणार आहे. या जागेवर आधीच कोल्हापुरचे संजय जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांची कटुताही शिवसेनेने स्वीकारली आहे.

अशा परिस्थितीत महाविकास आघाडी एकसंघ राहणार का? संभाजीराजे यांची भूमिका काय असेल? आणि भाजप नेमकी कोणाची मते फोडणार? याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!