आरोग्य व शिक्षण

खळदे मळा तळेगाव दाभाडे येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री साजरी.

हजारो भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ.

Spread the love

खळदे मळा तळेगाव दाभाडे येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री साजरी…हजारो भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. १९ फेब्रुवारी.

खळदे मळा तळेगाव दाभाडे येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त, काल पहाटे; ४ वाजता, राजेंद्र खळदे, शिक्षण मंडळ सभापती. यांच्या परिवाराच्या वतीने अभिषेक व पुजा करण्यात आली.

नंतर भाविक भक्तांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसरात रांगा लावून हजारो भक्तांनी  दर्शन घेतले.संपुर्ण परिसर नागरिकांनी गजबजून गेल्याने त्याला यात्रेचे स्वरूप आले होते.

 

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण खळदे कुटुंबीयांकडुन मागील ४८ वर्षांपासून भंडाऱ्याचे नियोजन केले जाते. अशीच परंपरा कायम स्वरुपी राखणार असल्याचे; नविन पिढीत करणाऱ्या मुलांनी सांगितले.प्रसाद घेण्यासाठी तळेगाव परिसरातील हजारो नागरिक बंधू भगिनीं उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतात.

यंदाच्या वर्षी देखील दोन ते अडीच हजार नागरिक बंधू भगिनींनी महाप्रसाद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, यादवेंद्र खळदे. या. उपनगराध्यक्ष, राजेंद्र खळदे, चंद्रभान खळदे, संकेत खळदे, अमर खळदे , संदिप खळदे व  खळदे परिसरातील सर्वांचे योगदान आहे.

अशा प्रकारे होत असलेल्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!