ताज्या घडामोडी

वाटद कवठेवाडी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

खंडाळा : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विद्यार्थी मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री स्वप्नील भास्कर घवाळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत प्रतिमापूजन केले.
त्यानंतर जयंती उत्सव सोहळ्याचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी करत विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देतानाच कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या समता सप्ताहात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थी स्वप्निल भास्कर घवाळी, नयन नामदेव बारगुडे, आर्यन दिलीप तांबटकर, गौरी संदीप धनावडे, प्रांजल नितीन कुटे, श्रावणी महेश घवाळी, विघ्नेश दीपक कुर्टे, राज शंकर धनावडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित असणारे त्यांचे कार्य आणि जीवनचरित्राची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गीतामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती आदर दर्शवत विविध गाणी सादर केली. तर शाळेतील सहशिक्षक श्री. गोविंद भाऊराव डुमनर यांनीही आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आपला आदर्श मानून त्यांच्या कार्याप्रती आदर राखून एक नवा इतिहास घडवावा की जेणेकरून अजूनही समाजामध्ये कितपत पडलेल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल.
तसेच यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
संपूर्ण कार्यक्रम शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर आणि केंद्रप्रमुख अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि सहकारी शिक्षक गोविंद डुमनर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!