क्रीडा व मनोरंजन

जलतरण स्पर्धेत सियाने मिळवली ६ पदके

Spread the love

मुंबई : नुकत्याच कोल्हापूर येथील स्विमिंग हबने सागर पाटील जलतरण तलावात आयोजित केलेल्या निमंत्रित राज्यस्तरिय जलतरण स्पर्धेत विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे संकुलाच्या सिया देवरुखकर ने चमकदार कामगिरी करताना ३ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य अशी एकूण ६ पदकांची कमाई केली. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिने पहिल्या स्पर्धेत भाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या ओडिसा येथील राष्ट्रीय स्पर्धेत तिने ४०० मीटर फ्रीस्टाईल गटाची अंतिम फेरी गाठली होती. तर अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सियाने १५ वर्षाखालील गटात चमकदार कामगिरी केली होती. सध्या ती संदीप नेवाळकर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. कोल्हापूर स्पर्धेत सियाचा लहान भाऊ दुर्वेशने देखील १ सुवर्ण, २ कांस्य पदके पटकावली. सध्या सिया पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमात ८व्या इयत्तेत आणि भाऊ दुर्वेश चौथ्या इयत्तेत शिकत आहे. सियाच्या या यशाबद्दल संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी तिचे खास अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!