ताज्या घडामोडी

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर… अखेर टाकळीमिया सोसायटी बिनविरोध

Spread the love

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामस्थांनी विकासकामासाठी बिनविरोध निवडणुकीची परपंरा जपण्याचा निर्धार करीत सेवा संस्थेच्या कारभारींची निवड सर्वानुमते केली आहे. परिणामी सेवा संस्थेची बिनविरोध निवडणूक होऊन ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश करपे यांच्यावर विश्वास दर्शविला आहे.

निवडणूक पूर्वीच दोन जागांवर एकच अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध झालेल्या होत्या. उर्वरित ११ जागेसाठी २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते . ८ एप्रिल ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख होती.
त्यावेळी काही उमेदवारांनी अर्ज शेवटच्या मिनिटा पर्यंत लावून धरल्यामुळे ऐनवेळी धावपळ चालू झाली , अजित करपे हे जनरल मधून उमेदवारी करणार होते तर राहुल जाधव हे ओ बी सी मधून उमेदवारी करणार होते पण अजित करपे यांनी मनाचा मोठे पणा दाखवत उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यात प्रसाद शिंदे व नारायण शिंदे यांची शिष्टाई कमी आली.

व राहुल जाधव यांना ओबीसी मधून बिनविरोध घेऊन निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा केला.
सर्वसाधारण च्या ८ जागा असुन यासाठी १३ जणांचे अर्ज दाखल झाले होते पैकी अरविंद चोथे, अजित करपे, राहुल जाधव, गणेश शिंदे, मारूती निमसे या ५ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने सुरेश करपे, रमेश निमसे, सुभाष करपे, अशोक मोरे, सचिन शिंदे, रावसाहेब उर्फ राहुल चोथे, सुभाष जुंदरे, शिवशंकर करपे हे बिनविरोध झाले आहेत,
महिला राखीव च्या २ जागा असुन यासाठी ५ अर्ज दाखल झाले होते यापैकी ताराबाई करपे, छाया निमसे, कांताबाई निमसे यांनी अर्ज माघारी घेतल्याने ताराबाई तोडमल, लताबाई शिंदे या बिनविरोध झाल्या आहेत,
इतर मागासवर्गीयची १ जागा असुन त्यासाठी ३ अर्ज दाखल झाले होते पैकी शिवाजी भवाळ व अजित करपे यांनी अर्ज माघारी घेतल्याने राहुल जाधव बिनविरोध झाले आहेत.
अनुसूचित जाती साठी १ जागा असुन त्यासाठी गीतांजली सगळगिळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत तसेच भटक्या विमुक्त जाती साठी १ जागा असुन त्यासाठी पद्माकर गोसावी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध झाले आहेत अशा प्रकारे या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे प्रथम पासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्तारूढ गटाकडून प्रयत्न केले जात होते. त्याला अखेर यश आले.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश करपे, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व मियासाहेब सह पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे, दैवत उद्योग समुह व दैवत पतसंस्थेचे अध्यक्ष केशवराव शिंदे, माजी सरपंच सुभाष करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक शिवशंकर करपे, वैभव पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश भा. करपे उपसरपंच सुभाष जुंदरे, अजित करपे,प्रसाद शिंदे ,,गुलाब निमसे ,नारायण शिंदे, यांनी विशेष प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक म्हणून मुख्य सचिव बाळासाहेब माळवदे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!